Feels Like Heaven ... !
काल घरात बसून अगदी कंटाळा आला होता.. गाडी काढली आणि लॉंग ड्राईव्हला गेलो.. जवळच अतिशय अप्रतिम जागा आहे.. सुंदर समुद्र,शांत परिसर.. एकही घर नाही आसपास.. बाजूला डोंगरांची रांग, वळणदार घाट.. सूर्याच्या उन्हात चकाकणारी मऊसर वाळु, कधी धीरगंभीर, शांत तर कधी उधाण आलेला समुद्र ! उगीच आपल्या पायात पाय कराणारे धीट सीगल्स.. एखाद-दुसरी फॅमिली/कपल खूर्च्या टाकून निवांत बसलंय, कधी एकमेकांच्या विश्वात तर.. कधी नुस्तंच शांतपणे समोरचं सुंदर निसर्गचित्र डोळ्यात साठवत, हळूहळू बुडणारा सूर्य पाहात.. कोणी हौशी फोटोग्राफर येऊन फोटो काढत बसलाय.. कोणी चित्र काढताना दिसलं नाही.. कदाचित ते मनोरम दृश्य चितारणे फक्त वरच्यालाच जमेल.. आपण फक्त तिथे जाऊन आस्वाद घ्यायचा.. दुसरं काय करू शकतो नाहीतरी आपण? या टेंप्लेटमधे फोटोज दिसायला अडचण येतेय.. :( किती त्रास! तोवर ही लिंक घ्या.. माझे फ्लीकर अकाउंट..