कंटाळा..
मी आत्तापर्यंत खूप वेळा दुपारी एकटी राहलीय घरात.. एस्पेशिअली दादा अमेरीकेला गेल्यावर जास्तच.. आधी आमचा धिंगाणा चालायचा दुपारी,आई-बाबा ऑफीसमधून येईपर्यंत .. नंतर मी आणि आज्जीच... मला आठवतंय तेव्हापासून, साधाराण आमच्या शाळा सुरू झाल्यापासून आज्जी दुपारी एकटीच असायची घरी.. बरीच वर्ष कान-डोळे ठीक असे पर्यंत आज्जी टीव्ही पाहायची, रेडीओ ऐकायची.. काही बाही वाचत बसायची सतत.. अभंग, भजनं वगैरे.. नाहीतर शिवणकाम असायचंच.. नंतर मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले, कानही जरा दगा द्यायला लागले तसे आज्जीनी टीव्ही,रेडीओ बंद केले.. वाचनही कमी केलं.. ह्म्म, स्वयंपाक मात्र कायम असायचाच .. अजुनही आज्जी स्वयंपाक करायच्या उत्साहात असतेच, पण आता मात्र बर्याच गडबडी होतात दिसत नसल्यामुळे.. असो.. तर सांगायचा मुद्दा हा, की ती सतत एकटी असते , निदान दुपारी.. तरी एकदादेखील कंटाळली नाही.. सतत काहीतरी चालू असते तिचं.. मी तिथे होते तेव्हा आमच्या गप्पा चालायच्या बर्याच.. दुपारचा चहा पिताना ती मला माहीत असलेल्या/नसलेल्या गोष्टी सांगायची.. कित्येकदा इतक्या जुन्या गोष्टी, की मला संदर्भच लागायचे नाहीत.. पण तेव्हा वेळ छान जायचा... आता ...