द हॅपनिंग...

मध्यंतरी जास्वंदीचे फळ ही कथा वाचनात आली.. त्या कथेची एकंदरीत कन्सेप्ट, व तिथले प्रतिसादांवरून कळले की द हॅपनिंग मधे असंच काहीसं आहे.. तेव्हापासून तो पाहायचाच होता..

परवा रात्री पाहीला..

काहीतरी होतं, सगळे नाहीसे होतात.. म्हणजे स्वत:ला मारून घेतात.. असं काहीतरी होतं या पिक्चरमधे आणि तो नाईट श्यामलनचा पिक्चर आहे, याव्यतिरिक्त काहीएक माहीत नसताना लावला....   

SPOILER : (ज्यांनी पाहीला नाहीये हा मुव्ही, त्यांनी रहस्यभेद न होण्यासाठी पुढे नाही वाचलं तर खरं म्हणजे बरं पडेल.. काहीएक माहीत नसताना हा पिक्चर बघण्यात कदाचित जास्त मजा(भिती?) आहे !) 

सुरवात सेंट्रल पार्क न्युयॉर्क.. रोजचीच सकाळ, लोकांचे नेहेमीचे रूटीन.. कोणी फिरायला आलेय, कोणी वाचत बसलेय.. पण अचानक लोकं डिसओरिएंटेड होतात.. पहील्यांदा असंबद्ध बडबड, कुठेतरी हरवलेली नजर.. मग पूर्णपणे सगळं जनजीवन ठप्प होऊन थांबते.. सगळे स्तब्ध.. 
आणि मग सिरिज ऑफ सुसायडल इव्हेंट्स.. सगळी लोकं, त्यांना जो जवळचा मरायचा मार्ग असेल तो स्विकारून मरतात... 


म्हणजे... पिक्चरमधे दाखवलेली क्लेअर.. केसांची पीन मानेत खुपसते.. कुठल्याश्या बांधकामावरची लोकं, सटासट बिल्डींगवरून खाली कोसळतात.. ( हे सगळ्यात भयानक दृश्य! ) :| 
हळूहळू समजते की हा एकप्रकारचा ऍटॅक आहे.. आधी तो टेररिस्ट ऍटॅक वाटतो.. काहीतरी बायोलॉजिकली केलेला... मूळात सगळीकडे गोंधळ सुरू होतो.. न्युयॉर्क सिटी खाली करण्याचा निर्णाय होतो.. सगळे सामान घेऊन निघतात प्रवासाला.. 

जसाजसा प्रवास चालू होतो.. तशा न्युज येतात.. कुठला एरिआ अफेक्टेड झाला.. कोणी कसं मारले स्वत:ला !! (यात एका प्राणीसंग्रहालयातले दृश्य आहे.. तो माणुस स्वत:ला वाघ-सिंहाच्या हवाली करतो.. ) 
चित्रपटाचा नायक, त्याच्या बायको वर मित्राबरोबर निघालेला.. त्याचा मित्र (त्याच्या) बायकोला शोधायला जातो दुसर्‍या गावी.. तिथे तोही अफेक्टेड एरिआ.. मरायचे मार्ग शोधून मरतात सगळे... 

इकडे नायक.. एका बॉटनिस्टच्या गाडीत बसून निघतो.. त्या बॉटनिस्टच्या मते, हे सगळं झाडं घडवून आणत आहेत.. ते कम्युनिकेट करत आहेत वार्‍याच्या मदतीने.. आणि काही विषारी केमिकल्स सोडून माणसांना मरायला भाग पाडत आहेत... नायक-नायिका त्याला सायकीक समजून त्याचे बोलणे हसण्यावारी सोडून देतात .. 

पुढे बर्‍याच गोष्टी घडतात.. नायक सांईटीस्ट असल्याने जरा विचार करतो.. बॉटनिस्टचे म्हणणे कदाचित खरे असावे अशा मुद्द्याला येऊन थांबतो... त्यावरून असा निष्कर्ष काढतो, की जेव्हढी कमी लोकसंख्येची जागा, जितकी कमी लोकं तितका धोका कमी आहे.. म्हणून ग्रुप्स स्प्लिट करून फिरत राहतात... 

एका घरी पोचतात... तिथली जगाशी काहीही कॉन्टॅक्ट नसलेली बाई त्यांना थारा देते... जेवायला आणि रात्री राहायला जागा देते... पण व्हीमझिकल स्वभावाची चुणुक दाखवून देते... हे सगळे तिच्या घरी काहीतरी चोरी करायला आलेत ही तिची भावना... 

शेवटी तीही खिडक्यांवर डोकं आपटून मरून घेते.... म्हणजे एकट्यालाही धोका आहेच... याचाच अर्थ नायक-नायिकाही धोक्यात आहेत... ..... 

असो... 
शेवट सांगण्यात काही हशील नाही... 

नाईट श्यामलनचे डोके काहीतरी भन्नाट चालते हे नक्की .. परंतू सिनेमा अर्धवट संपल्यासारखा वाटतो... हे का होते.. असे का झाले असावे याचा विचार आपणच करायचा.. 
माझं डोकं सतत विचार करत होते.. सतत तर्क.. की कदाचित आपण झाडांवर अन्याय केला त्याचा बदला... किंवा विद्न्यानाने इतके बदल घडवून आणले की नेचरचा इम्बॅलन्स झाला... म्हणून झाडांमार्फत हा निसर्ग विद्न्यानाच्या जनकाला मारून टाकतोय.. इत्यादी ! 

पण हे काहीही न सांगता पिक्चर संपतो.. इतकंच कळते की ही वॉर्निंग आहे... कशाची, कशाबद्दल माहीत नाही... 
सिनेमा संपता संपता पॅरिस मधेही हे इव्हेंट्स सुरू झाल्याचे दाखवले आहे... 

शेवट थरारता करण्यात यशस्वी झालाय श्यामलन... पण तर्क, अनुमान आपणच काढायचे ! त्यामुळे जरा अपूर्णता आहे या पिक्चरमधे... 

तरीही मला आवडला... क्षणभरही मी हलू शकले नाही टीव्हीपासून.. इतके मृत्यूचे थैमान असून काही १-२ अपवाद सोडले तर किळसवाणा काही प्रकार नाही... भितीदायक आहे, पण विचार करायला लावणारा जास्त आहे... पिक्चरमधे जे दाखवले आहे त्याच्या भितीने झोप उडण्यापेक्षा, असे खरंच झालं तर या विचाराने झोप उडते... आपले खरेच कहीतरी चुकते आहे आणि आपण उद्यापासून शक्य तितक्या निसर्गाच्या कलाने राहीले पाहीजे वगैरे विचार येतात ! जे मला आवडलं! पिक्चरचे सीन्स लक्षात न राहता कन्सेप्ट लक्षात जास्त राहीली आहे... 

चित्रीकरण अप्रतिम ! मी श्यामलनचा चित्रपट पहील्यांदा पूर्ण पाहीला... सिक्स्थ सेन्स, साईन्स मी नीट बसून नाही पाहीले कधी... पण हे जे काही पाहीले.. त्यावरून श्यामलनची डोकॅलिटीचा अंदाज आला... 

(ज्यांना वाचायची उत्सुकता आहेच, त्यांनी हे वरचे पांढर्‍या शाईतले वाचावे.. ) :) 
मी सर्वांना रेकमंड करीन हा मुव्ही.. नक्की पाहा! माझ्याकडून १० पैकी ९... १ मार्क कमी कारण आपल्याला फार विचारात पाडतो.. आणि अर्धवट संपल्यासारखे वाटते म्हणून !! 

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
मी पहातॊ सिडी मिळेल तर .. आणि ती पांढऱ्या शाइची आयडीया मात्र एकदम भन्नाट आहे हं......
सखी म्हणाले…
What an idea Madamji :)
कुठून सुचलं हे भन्नाट काम?
Sntosh म्हणाले…
Khupach chhan idea aahe.
pan ek sangawese watte mhnun sangto, kai milte aapnas ase phswe kam karun, thik aahe na pan internet war sagale aasech chestra maskari karnare aahet ka ? thik aahe jyala je samsjel te samjawe, pan jeshtaancha aapan aapman karta aahat ase nai ka watat aaplyala..........
Bhagyashree म्हणाले…
अहो संतोष, यात कुणाला फसवलं आणि कुणाचा काय अपमान झालाय सांगाल का जरा? कैच्याकैच !!!!

मी जे वर केलेय त्याला सामान्य भाषेत स्पॉयलर अलर्ट्स देणे म्हणतात, जे थ्रिलर आणि सस्पेन्स मुव्हीच्या संदंर्भात देणे गरजेचे आहे नाहीतर सिनेमाची सगळी स्टोरी कळून पोपट होतो.. हे काही नवीन नाहीए! माझं डोकं फक्त इतकंच की पांढर्‍या शाईत लिहीलाय स्पॉयलर..

असो, कमेंट् साठी धन्यवाद!
Aniket Samudra म्हणाले…
पांढऱ्या शाईची कल्पना भन्नाट. सिनेमाबद्द्ल म्हणाल तर मला नव्हते माहीत की हा चांगला सिनेमा आहे म्हणुन. उलट मी ऐकुन होतो की खुप पकाउ आहे सिनेमा म्हणुन पहाण्याचे धाडस केले नव्हते, आता मात्र नक्की बघीन

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

चार्ली चॅपलीन.....!