आठवणी ... !!

सद्ध्या नॉस्टॅल्जिक होण्याचे दिवस आहेत बहुधा! मायबोलीवर फिरताना, आठवणीतले स्वर आणि सुगंध हा बुलेटीन बोर्ड दिसला.. आणि इतके वास आणि स्वर गर्दी करून दाटले!!

सुगंध आणि आठवणींचे खरंच काहीतरी नातं आहे .. मागच्याच पोस्ट मधे मी ओल्या मातीच्या वासाने वेडी होऊन काहीबाही खरडले होते.. आता तोच वेडेपणा पुढे कंटीन्यु करते..

वास म्हटलं की मला आठवते ते माझं पर्फ्युम्सचं कलेक्शन.. सगळ्यात पहील्यांदा माझं असं पर्फ्युम मला मिळालं १०वी च्या रिझल्ट नंतर.. आत्याने अमेरीकेमधून आणलेलं.. ते मी ११-१२वी मधे वापरलं.. आणि जेव्हा संपत आलं तेव्हा ती बाटली बाजूला ठेऊन दिली.. तेव्हापासून मला हा छंद लागला.. आवडतं सेंट पूर्ण संपवायचे नाही..

अजुनही ती बाटली उघडली की माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ समोर येऊन ठाकतो! ११-१२वी ! शाळा संपवून नुकतीच कॉलेज नावाच्या विश्वात पाऊल टाकलेलं.. फारसा अभ्यास करायची पद्धतच नाही.. त्यामुळे बारावीला देखील डोक्याला चिंता नव्हत्या! इझिली , लकीली मार्क्स पडत होते.. खूप नाही, पण वाईटही नाहीत.. त्यामुळे मी ते दिवस सगळ्यात एन्जॉय केले.. तिथेच मला माझे जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी भेटले.. २-२ वेगळ्या शाळा केल्यामुळे मला पूर्वी अशा जवळच्या मैत्रिणी वगैरे फार नव्हत्याच! पण ज्यु. कॉलेजमधे आमचा ६ जणींचा जो ग्रुप जमलाय.. तो १-२ सोडल्यास सगळा कॉन्टॅक्ट मधे आहे.. आणि सगळ्यात जवळचा आहे!

ती दुसरी बाटली उघडली, की फर्ग्युसन मधले ते दोन महीने आठवतात! तेच माझे शेवटचे काहीही चिंता नसलेले,सुंदर दिवस !! नंतर इंजिनिअरींगला आधीची अभ्यासाची मेथड फॉलो करणं चुकीचे होते.. त्यामुळे टेन्शन्स आली, अभ्यासाचा बोजा वाढला.. त्यामुळे ते दिवस खरेच सोनेरी!!

परवा असच मॉल मधे फिरताना Freesiaची बाटली दिसली!! आणि परत भुतकाळात गेले.. आई तेव्हा अमेरीकेमधे गेली होती.. २ महीन्यांनी जेव्हा ती घरी आली.. तेव्हा माझी खरेदी स्पेशल एका बॅगेमधे ठेवली होती! बॅगभरून कपडे ... वॉव !! पण खरी मजा पुढे.. ती बॅग उघडली आणि पूर्ण खोलीभर freesia चा मंद,सुंदर सुवास पसरला!! प्रवासात ती बाटलीचे झाकण निघून निम्मं पर्फ्युम रिकामं झालं होतं!! पण पुढे किती तरी दिवस माझ्या त्या कपड्यांना तो मंद वास येत राहीला.. वेडावणारा वास खरंच !!

हे झाले पर्फ्युमचे, कृत्रिम वास! असेच किती तरी सुवास आहेत.. जाईच्या कळ्या, फुलं दिसली की मला आमच्या पूर्ण बाल्कनीला वेढून टाकलेला जाईचा वेल आठवतो.. मोगरा दिसला की, उन्हाळा, गार पाण्याचा माठ आणि आत मोगर्‍याचे फुल , आणि त्या पाण्याला येणारा मोगर्‍याचा वास हेच आठवते.. (उन्हाळा म्हटलं की आंबे,बाबांच्या हातचा रोजचा मॅंगो मिल्कशेक,सुट्ट्या, पोहोणं, मृत्युंजय,स्वामी वगैरेंची पारायणे करणे, कॅरम,व्हीडीओ गेम्स,३०४,चॅलेंज,बदाम सात असं काहीबाही पण आठवत राहतंच... )

कुठल्याही उदबत्तीचा,धूपाचा वास आला की संध्याकाळी चालणारी आई,आज्जीची पूजा आठवते.. आज्जीची भजनं,आरत्या,आईचे सुस्पष्ट आवाजातले ओम यद्नेन.. आठवायला लागते.. मंत्रपुष्पांजली आली की कॉलनीचा गणेशोत्सव ओघाने येणारच.. ज्यावर मी मागच्या वर्षी लिहीलेच आहे.. परत लिहीत नाही बसत..

कॉफी मी इतक्या वेळेला घेते.. पण मला अजुनही कॉफीचा वास आला, की पीएल्सच्या वेळेसची रात्रीची जागरणं आठवतात.. चहा म्हटलं की दोन गोष्टी समोर येतात! एक म्हणजे कॉलेज कँटीनचा चहा, मस्त वेलदोडे घातलेला, भरपूर दुधाचा दाट उकळलेला वाफाळता चहा! ज्याने मला पक्की चहाबाज केले.. मी इंजिनिअरींग पर्यंत चहा पीत नव्हते.. पण त्या चहाने समीकरणे बदलली सगळी.. ! चहाची दुसरी गोष्ट ही, की पावसाळ्यातली शनिवार दुपार आठवते.. शनीवारी आई घरी.. आणि बेदम पाऊस पडत असेल, तर आईच म्हणणार, चल चहा घेऊ गरम! बाबा यायच्या वेळेला मस्त गरम भजी!! वाह.. काय मस्त वाटायचं आमच्या कॉलनीच्या रस्त्याकडे ,मुसळधार पावसाकडे, त्यात भिजणारी कॉलनीमधली हिरवीगार वृक्षराजी पाहात चहा प्यायचा! कधी कधी आम्ही दोघी मुद्दम भिजायला बाहेर पडायचो!! धम्माल होती राव इंडीयात !!

बकुळीची फुलं दिसली की मला सातवी आठवते माझी ! बाबा सोलापूरला होते तेव्हा काही काळ.. तिथल्या गेस्टहाऊसच्या लॉन वर, सलग २ ते ३ दिवसात बकुळीच्या झाडाखाली बसून श्रीमान योगी वाचले होते तेव्हा मी.. भान हरपून वाचणारी मी, वरून बकुळफुलं पडतायत, आणि माझं सगळं जग शिवाजीमहाराजांमधे गुंतलेले.. ! तेव्हापासून झपाटून मोठी मोठी पुस्तके १-२ दिवसात देखील वाचू लागले..

huh.. फार फार आठवणी आहेत.. सगळ्या लिहून ठेवता येणार नाहीतच.. पण थोड्याफार आठवल्या त्या लिहील्या.. तुमच्या आहेत अशा काही आठवणी??
Signature2

टिप्पण्या

तुमचं वासाचं पुराण वासलं. (सॉरी...वाचलं!) मला काही त्यात गंध नाही. फक्त गटाराचा वास आणि फुलाचा वास यातला फरक कळतो, एवढंच!
पण परफ्युम बद्दल आकर्षण किंवा ऑब्सेशन असणार्‍यांबद्दल मला नितांत आदर आहे. मला स्वतला परफ्युम आणि सेंट यातला फरक अजून कळत नाही. लग्नाला पाच वर्षं झाली, तरी त्या वेळी प्रेज़ेंट मिळालेल्या पर्फ्युम आणि डिओ च्या च्या बाटल्या तशाच आहेत.
असो.
बाकी, माझ्या ब्लॉगची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. पण ती दोनदा का दिलेय बरे?
आणि हो, तुमचा ईमेल मिळू शकेल? मला ब्लॉग वर नाही शोढता येत. तसा अडाणीच आहे मी.
Bhagyashree म्हणाले…
मी तुमच्या ब्लॉगची लिंक एकदाच दिली आहे, असं मला वाटत आहे. "मी...अभिजीत" वाली..अजुन कुठली? आणि मला तुम्ही मेल bhag41-at-gmail-dot-com वर करू शकता..

कमेंट बद्दल धन्यवाद..
Sneha म्हणाले…
hay bhagyashree... sahich majhahi bahuda asach hot... mala tyamule loka tu magachya janmi kutra asashil mhanun tula uitake vas lakshat rahatat asa chiDavatat.. khup bar vatal majhyasarakh koNi aahe he vachalyavar

majhahi post hoil itake vas lakshat aahet majhya ..tujhyasarakhech...
11vi baravitali perfumechi baTali ajun mihi japun Thevali aahe

mogaraa nishigandh mala nehamich aaichi aathavaN karun deto aaila hi phul far aavaDayachi
bakuLichi fula mala majhi 3 ri 4 thichi aaThavaN karun detata..
aaga barach kahi aahe khup kisse (sorry commentbo cha vaapar jara jastach kela... aathavaNit vahun gele)
tha.mbate... thanx

...Sneha
Dk म्हणाले…
Hey, Bsk vaasa vrun anek aathvnee aahet.. pn tya tuzya evdhya chnglya padhten lihnayvhee haatootee naahee aane kntaala...

great lihilys.(actually me donda he srv marathit lihil hot pn ikde donda electricity failure zalyane me marathit lihaaycha naad sodla)

kaahetree ugaach purvee hindi lihil hote te aata publish kely do visit my new Hindi blog! (well phaar kaahe naahe ugaach tya tya velenusaar lihily :))

Deep
अनामित म्हणाले…
खुप छान कल्पना आहे... वासांचे जग !
Post आवडली.. anyway perfume वापरत नसल्यामुळे (अजुन तरी :)) perfume च्या काही आठवणी नाहित माझ्या कडे. पण मातीच्या सुवासाची, भाताच्या शेतातील, आईच्या फोडणिची, आंब्याच्या अढीची आठवण नक्की येते :)...
मस्त वाटले.
Unknown म्हणाले…
hey thanks sneha,deep and nile for commenting!! :)
Kishor म्हणाले…
Changla lihila ahes!

Adhi fast skim kela tevha dhakkach basla (mi fakta pahili batli ughadli, dusri batli ughadli evadhach vachala hota. te atyane anlela perfume vachlyanantar [gair?]samaj dur zala)
Bhagyashree म्हणाले…
lol kishor!! rofl.. changlach dhakka basla asel! :D

btw, u DO read my blog! i didnt knw that! thanks for reading and commenting! tu kahi lihla nahis parat? bhavishya mast hota!
Kishor म्हणाले…
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Kishor म्हणाले…
lihito ahe. pan cynical vatlya posts mazyach mala :D. Ata kahitari vegalach lihava mhanto.

magashi comment delete keli karan veglya account varun takli hoti chukun
Vinay Mahajan म्हणाले…
gr8 work mam...absolutly brillant!!
Sarika Kamat म्हणाले…
Too good Bhag!!
Ani vaas mhantla ki pahilya pausacha vaas avismarniya ahe. Atta dekhil anubhavat ahe me. Besides diwalit li sandhyakal, faral tayar hot astana che gharat ani baju chya gharatle dekhil suvaas masta vatat na :)
Bhagyashree म्हणाले…
hey saru! thanks for commenting g..tu pan kay athvani kadhlyas ! aredeva.. diwali !! am gonna miss it..

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

चार्ली चॅपलीन.....!