अपेक्षाभंग!!! ... :|

huh, पाहीला एकदाचा वळू! इतकी हैराण झाले होते मी ऑनलाईन मिळत नाही म्हणून.. पण मिळाला, आणि अगदी उत्साहाने बसले पाहायला.. नाही आवडला मला.. :( कदाचित खूपच अपेक्षा वाढल्या होत्या त्या पिक्चरच्या चर्चेने.. म्हणून असेल.. पण तितका नाहीच आवडला..
ह्म्म आता तांत्रिक बाजू चांगल्या आहेत.. पिक्चर ’बघायला’ मस्त वाटतो.. गावतलं वातावरण,ते राजकारण मस्त घेतलंय.. पण ज्या बद्दल आहे पिक्चर तो वळू, म्हणजे देवाला वाहीलेला, माजलेला बैल.. तो किती शांत दाखवावा? नुस्ता आपला इकडुन तिकडे फिरतोय.. आणि म्हणे डुरक्याचा लई त्रास.. तितका त्रासदायक नाहीच वाटला तो.. [ गोड आहे उलट! :))) ] आणि त्याचा सस्पेन्स तो किती! मला वाटलं चांगला मोट्ठा असणार, त्याला पकडणं खूप अवघड जाणार .. कसलं काय.. १०-५ पावलांवरून ते इंजेक्शन मारतात.. इतकी लोकं पळत , दंगा करत येतात, त्या आवाजाने बैल ढिम्म हलत नाही! ही लोकं इंजेक्शन कधी मारतायत अशी वाट पाहात उभा राहीलेला वाटतो.. असो.. ते डॉक्युमेट्री घेणं वगैरे मला विनोदी वाटलं.. आणि दिलीप प्रभावळ्कर अजिबात विनोदी नाही वाटला.. काहीच्या काही घुसडलीयेत काही काही लोकं! दिलिप प्रभावळकर, अमृता सुभाष आणि कोण तो तिचा मित्र.. काय काम होतं त्यांच इथे देवाला ठाऊक.. अतुल कुलकर्णीचे काम इतर कुणीही करू शकला असता, असं एरवी जे वाटत नाही, ते फिलींग आलं त्याचं काम पाहताना..
आता टिंग्या पाहायचाय.. तो आवडेल नक्की असं वाटतेय.. तो असा अपेक्षाभंग नाही करणार असं वाटतंय.. बघू..काय होतय..
Signature2

टिप्पण्या

Vikram Waman Karve म्हणाले…
Valu is one of the best movies I have ever seen
Unknown म्हणाले…
hmm,my bad i dont feel so..
नीरजा पटवर्धन म्हणाले…
Thank god.. there is someone else as well who feels the same way! :)
Unknown म्हणाले…
yup ajjuka, i had read ur review on valu before..
initially i felt, okay this is going to be a gr8 movie.. pan pudhe sarkatch nahi rav kahi.. anyways.. thanks for ur comment..
xetropulsar म्हणाले…
भाग्यश्री. . .इकडे महाराष्ट्र मंडळाने वळूचा प्रयोग आयोजीत केलाय. . .व्यवस्थीत चित्रपटगृहात, मोठ्या पडद्यावर वगैरे. . .अपेक्षा अर्थातच आहेत. . .घटकाभर करमणूक करणारा असावा इतकी माफक अपेक्षा साध्य झाली तरी पुरे. . .तो पाहून आल्यावर पुन्हा एक प्रतिक्रिया लिहीन.
Monsieur K म्हणाले…
i agree - it doesnt do justice with respect to the hype it has generated. however, it makes a decent watch in the cinema hall, something that u cant experience on a laptop or desktop.

i found Tingyaa better - its definitely low budget as compared to Valu - initially, i couldnt understand the language too - it is very rustic - but the movie grows on u - especially Tingya, the small boy.
nakki bagh - jamla tar mothyaa padyaavar :)

p.s. Tingya is a very simple movie - ugichach jaasti apeksha thevu nakos, mhanje punha apeksha-bhang honaar naahi :)
मला तर बुवा आवडला ’वळू’. गावाकडची सर्व पात्रे पण इरसाल वाटली. प्रभावळकरांचे पात्र मात्र विनोदासाठी उगाचच टाकलेले वाटले. एकंदर हिंदी मराठी सिनेमा व भयानक मराठी सीरियल्स पाहून आलेला उबग जरा दूर झाला. ’वळू’ जरा मवाळच वाटला हे मात्र पटले. अहो खर्‍या माजलेल्या बैलाबरोबर काम कोण करणार? टिंग्या मात्र बघायचा राहिलाच.
Unknown म्हणाले…
hehe phadnis kaka, majlelya bailach point lakshatch ala nahi!! :D hmm baki gavatli patra avdli ho.. to jivnya zalay tyach kam kharach mast zalay.. pan overall effect titka bhari navta asa..
ketan, laptop var pahilyacha parinam vagere pan asel nakkich.. mothya padadyavar sagle movie changlech vattat.. :D kidding.. ata tingya baddal apeksha far nahi thevat re.. mhanje bara padel.. :)
thanks alot saglyanna..
अनामित म्हणाले…
Hey .. Mala matra Valu avadala... Durkya titkasa bhitidayak vatat nahi he matra mala hi khatakale, pan cinemache taking ani sagalyancha abhinay matra chan jamun aalay. Dilip prabhavalakaranche ghar he chitrapatatil ekmev tatastha ghar ahe... na sarpanchachya bajune na aabanchya... ani tyana durkyachya samasyeshihi pharase dene-ghene nasate... ani ase barech kahi !!
अनामित म्हणाले…
same here. malahee valu naahi avadalaa. Tingyaa matra avdalaa. Kharech chchan ahe. Tingyaa ajibaat chukavu naka.Utaam abhinay, direction , patakthaa, sanvaad. Kuthe naave thevayala jagaach nahi.
Amol म्हणाले…
मला तू वर दिलेल्या काही कारणामुळेच बर्‍यापैकी आवडला वळू. ते दिलीप प्रभावळकर चे सीन्स, वळू चा शांतपणा, ते प्रेमप्रकरण (ती अमृता सुभाष आहे हे लक्षातच आले नाही) हे चुकीचे/उगाचच घुसडले आहे वगैरे मान्य. पण गावातले लोक, त्यांच्या मान अपमानाच्या कल्पना, राजकारण वगैरे मस्त दाखवले आहे. मला ती "रातच्याला वशाट खात जाउ नको" वाली अ.सु. ची मैत्रीण धमाल वाटली. तसेच अतुल कुलकर्णी वगैरे लोकांचे त्या गावातील लोकांशी संवाद न होउ शकणार्‍या छापील/शहरी मराठीत बोलणे ही मजेदार वाटले.

अर्थात 'टिंग्या' खूपच चांगला आहे यापेक्षा, नक्कीच बघ.
Unknown म्हणाले…
अमोल धन्यवाद! टिंग्या मी नंतर लगेचच पाहीला, व बेहद्द आवडला.. फार रडवलं पण त्या पिक्चरने..

असो, मी वळू परत पाहीन म्हणतेय आता.. तेव्हाच्या भरपूर अपेक्षा ठेऊन पाहील्याने डोक्यात घुसला होता .. कदाचित आता आवडेलही! :)

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"काय करतेस दिवसभर??"

Wish List..

चार्ली चॅपलीन.....!