कंटाळा..
मी आत्तापर्यंत खूप वेळा दुपारी एकटी राहलीय घरात.. एस्पेशिअली दादा अमेरीकेला गेल्यावर जास्तच.. आधी आमचा धिंगाणा चालायचा दुपारी,आई-बाबा ऑफीसमधून येईपर्यंत .. नंतर मी आणि आज्जीच... मला आठवतंय तेव्हापासून, साधाराण आमच्या शाळा सुरू झाल्यापासून आज्जी दुपारी एकटीच असायची घरी.. बरीच वर्ष कान-डोळे ठीक असे पर्यंत आज्जी टीव्ही पाहायची, रेडीओ ऐकायची.. काही बाही वाचत बसायची सतत.. अभंग, भजनं वगैरे.. नाहीतर शिवणकाम असायचंच.. नंतर मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले, कानही जरा दगा द्यायला लागले तसे आज्जीनी टीव्ही,रेडीओ बंद केले.. वाचनही कमी केलं.. ह्म्म, स्वयंपाक मात्र कायम असायचाच .. अजुनही आज्जी स्वयंपाक करायच्या उत्साहात असतेच, पण आता मात्र बर्याच गडबडी होतात दिसत नसल्यामुळे.. असो.. तर सांगायचा मुद्दा हा, की ती सतत एकटी असते , निदान दुपारी.. तरी एकदादेखील कंटाळली नाही.. सतत काहीतरी चालू असते तिचं.. मी तिथे होते तेव्हा आमच्या गप्पा चालायच्या बर्याच.. दुपारचा चहा पिताना ती मला माहीत असलेल्या/नसलेल्या गोष्टी सांगायची.. कित्येकदा इतक्या जुन्या गोष्टी, की मला संदर्भच लागायचे नाहीत.. पण तेव्हा वेळ छान जायचा...
आता दुपारी ती तिथे एकटी असते , न मी इथे एकटी असते... पण मला खात्री आहे,की ती काहीतरी काम काढून व्यस्त राहात असेल.. मी मात्र इथे कंप्युटर समोर बसून काहीतरी कारण शोधते बिझी राहण्याचं.. पण कंटाळते.. आज्जीसारखी सतत कामात राहायची आवड नाही.. or mayb सवय नाही...(केली पाहीजे आता!)मला कमाल वाटते त्या पिढीतल्या लोकांची... माझे maternal आजोबा देखील एकटे राहात होते शेवटचे ४-५ वर्ष.. ऐकू जवळपास यायचे नाही, त्यामुळे लोकांशी गप्पा वगैरे जवळपास नाहीतच.. पण किती आनंदी,आणि बिझी असायचे.. क्रिकेट म्हणजे त्यांचा जिव की प्राण.. match असली की आजोबा जाम खूष.. मग आपण जिंकलो की मस्त पार्टी करणार... एकंदरीत समाधानात राहणार..
हे जमणं किती अवघड आहे ते कळतंय आता... मला माहीती आहे की आज ना उद्या मला काम असणारे.. खूप बिझी रुटिन होईल माझं... नवीन गोष्टी शिकायला आहेत.. स्वयंपाकघर तर प्रयोगशाळाच आहे.. कितीही प्रयोग केले तरी न पुरणारे आहेत.. कंप्युटर,एखादं छान पुस्तक वाचायला डोळे शाबूत आहेत.. मग हा कंटाळा का येतो? किंवा मी येऊ देते त्याला.. थोडतरी आज्जी-आजोबा किंवा आईबाबां सारखा होता आलं तर किती बरं होईल...!!

टिप्पण्या
best of luck for ur prosporous future.
लेख मस्त जमलाय. आणि तुमचा ब्लॉगही सुरेख आहे.
"ata aajji dupari tikade ekti aste ani mi ithey..." hey vachun pani ala dolyat..kharach..maza pan excatly same zala hota ...
To make things worse jevha ithye dupar aste tevha tithey ratra..phone pan nahi karta yet.