मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

August, 2015 पासूनच्या पोेस्ट दर्शवित आहे

माझे रंगकाम -९

Quirky by Angie Grace.Medium - basic, metallic and glitter gel pens.





माझे रंगकाम - ८

माझे रंगकाम - ७

हे सिक्रेट गार्डनचे चित्र झाले एकदाचे पूर्ण! काय दमवलंय ह्या चित्राने. इतकं प्रचंड डिटेलिंग आहे.. संपता संपेना. पण ह्या कलरिंग अॅक्टीव्हिटीचा मेन उद्देश पेशन्स वाढवणे असल्याने पुस्तक भिरकावून न देता, केले एकदाचे पूर्ण. (मात्र शेवटी हातघाईला आलेले अगदी दिसून येतंय. पूर्ण चित्रात रात्रीचा निळसर पर्पल अंधाराचे वातावरण निर्माण करावे म्हणून पेन्सिल घेतली.. अन शेवटी अगदीच घाई केली. फराटे उठले. ते ब्लेन्ड होऊ शकतील. पण आता पेशन्स खरंच संपला! निदान आजसाठी. परत नंतर दुरूस्त करीन चित्र.. )
It took forever! The detailing in this picture as well as choosing 50 shades of Green was a daunting task. I know it could have been better. My so called attempt of showing blue and purple tint to the picture is almost a failure. But anyway.. I'm just glad it's over! It took 5 days..





माझे रंगकाम - ६

Medium - Markers Coloring Book 'Quirky' by Angie Grace.

रिमझिम रिमझिम...

मी इतक्या उत्साहाने पावसाचे फोटो टाकायला आले आहे हे पाहून मलाच हसू येतंय! :heehee: कारण मी राहते दुष्काळी भागात. दक्षिण कॅलिफॉर्नियामध्ये. आमच्याकडे मोजून आठवडाभर पाऊस पडत असेल.. वर्षभरात. :thinking: तोही वरील शीर्षकाप्रमाणे रिमझिमच. कधीच मुसळधार नाही. ह्याच वर्षी जरा जुलै मध्ये देखील पाऊस होण्याचे चमत्कार झाले आहेत. अर्थात अजुन साऊथ साईडला. माझ्या एरियात, वेस्ट हॉलिवुडमध्ये नाहीच. तर म्हणूनच की काय, माझ्याकडे इथल्या पावसाचे बरेच फोटो आहेत. कारण कौतुक ना. आकाशातून पाणी पडले खाली की मी फोटो काढायला तयार! अजुन पुष्कळ सापडतील. पण सध्या हे सापडले तेव्हढे अपलोड करते. :) [Click photo to see the full size image] १) हा जुन्या गावातला पाऊस. (Camarillo,CA) 2) ढग अगदी आकाश गजबजून टाकतात. पण आम्ही आपले लगान सारखे काले मेघा काले मेघा पानी तो बरसाओ गात असतो! 3) सांजवेळी ढग दाटून आले, पाऊस अगदी पडणारच आता.. अशा वेळेस असा सुरेख रंग पसरतो.. निळी शाईच.. 4) हा कुंद वातावरणाचा फोटो नाहीये, तर पाऊस अ‍ॅक्चुअली पडत आहे! nerd घड्याळात वाजले दुपारचे १२!! 5) हा प्रॉबेबली गेल्या ४ वर्षातला …