२० फेब्रुवारी, २००९

डबा ऐसपैस !!

आज एक मजाच सापडली!!!

पद्मगंधा प्रकाशनाचा दिवाळी अंक वाचत होते आज.. द.दि. पुंडे नामक लेखकाचा "डबा ऐसपैस, शब्द ऐसपैस" हा लेख वाचला.. आणि मी उडालेच !

त्यात असा उल्लेख होता की बालभारतीच्या द्न्यानदा नाईक लंडनला गेल्या असताना त्यांना तिथे काही मुलं चक्क डबा ऐसपैस खेळताना आढळली! त्यांच्या लंडनस्थायिक मैत्रिणीशी बोलल्यावर त्यांना कळलं की ती मुलं , "द बॉय ,आय स्पाय यु" हा गेम खेळत होते.. तोच बहुधा आपल्याकडे डबा ऐसपैस म्हणून आला.. !

हा उल्लेख वाचून मी उडाले खरं.. पण असा खरंच गेम आहे का, याची मला उत्सुकता शांत बसू देईना.. थोडं गुगललं तेव्हा हे मिळाले.. I Spy..

म्हणजे असं असण्याची शक्यता नाकारता येत नाही! :)

चला बर्‍याच दिवसांचे कोडे सुटले.. नाहीतरी या खेळात ऐसपैसचा काय संबंध हे मला कळतंच नव्हते!! :)

( अजुन किती अपभ्रंश आहेत हे शोधायचा चाळा लागलाय.. नॉठॅठोम, टैम्प्लीज वगैरे आठवले.. बघु अजुन काय निघतंय! ) :))
Signature2

१० फेब्रुवारी, २००९

माझेही दोन पैसे..

मला खरंतर अजिबात हे पोस्ट लिहायचे नव्हते.
सगळे हेच लिहीत आहेत! सारेगम लिट्ल चॅम्प्स.. रिझल्ट वगैरे.

पण काही गोष्टी वाचल्या आणि डोकंच आऊट झालं!
कार्तिकी जिंकली यात अपेक्षाभंगाचे दुःख्ख वाटणे मी समजू शकते.
प्रथमेश, आर्या खूप डिझर्विंग होते वगैरे. पण म्हणून ते नाही जिंकले, तर किती गदारोळ!?

आर्या/प्रथमेश इव्हन सुरात जरा कच्चा असणारा रोहीत जिंकला तर तो बरोबर रिझल्ट!

आणि ताला सुराची उत्तम जाण असलेली, रोहीत इतकीच उत्कृष्ट परफॉर्मर असलेली कार्तिकी जिंकली ,
की ते राजकारण, चुकीचा निकाल, झी चे अंतर्गत राजकारण, कार्तिकीच्या पालकांनी पैसे चारले, आणि या सगळ्याच्या वरताण कडी म्हणजे, ’गायकवाड’ नाव ना तिचं!!!
अरे काय चाल्लंय काय?? हा?
आजच्या जमान्यात, हे असे विचार कोणी करू शकत असेल हा विचार मी या जन्मातच काय पुढच्या ७ जन्मात करू शकले नसते..
मटा मधेही यावर भरभरून लेख आले. अनेक फोरम्सवर वाद पेटले आहेत! काही लोकं तर सगळा राग त्या बिचार्‍या कार्तिकीवर काढत आहेत! तिला सगळी गाणी तरी येत होती का, कस्ला तो भसाडा आणि लाऊड आवाज, अन काय काय... अरे कमॉन, तिच्याकडे टॅलंट नसतं तर ती नक्कीच इथे नसती आली! तसं व्हायला हे काही हिंदी सारेगम नाहीए ! की केवळ लोकांची करमणूक होतेय ना, मग ठेवा त्या आस्माला! मराठी सारेगमची अजुन तरी तेव्हढी अधोगती नाही झालेली. टॅलंट ला महत्व आहे अजुन....

माझं स्वतःचे मत असे आहे, की प्रथमेश सुराला अतिशय पक्का(सगळ्यांच्यात तो वरचढ होता त्याबाबतीत).. त्याचं काळ देहासि आला खाऊ मी अगणित वेळा ऐकले.. अजुन ऐकावेसे वाटते..!
आर्या सुर, हरकती सर्व छान.. पण नंतर नंतर तिचे परफॉर्मन्सेस प्लेन वाटायला लागले होते. अतिशय भारून जावं गाणं ऐकून असे तिच्या बाबतीत तरी माझे फक्त, युवती मना, आणि जाऊद्या सोडा याच गाण्यांना झाले. परत कधीही नाही...
रोहीत.. अशक्य इम्प्रुव्हमेंट.. कौतुकास्पद आहे ते.. पण मुळात सुर पक्के नसले की जरा गाणं पर्फेक्ट नाही होत. त्यामुळे जर्रा त्याने सुरावर मेहनत घ्यायला पाहीजे होती. पण, नक्कीच त्याने जिंकले.. काय एक एक परफॉर्मन्सेस होते त्याचे ! काय एनर्जी आहे !! त्याची बरीच गाणी मस्त झाली पण मोरया मोरया कधीही नाही विसरणार मी!
मुग्धा.. इतक्या लहान वयातील तिची गाण्याची जाण अफलातून आहे. गातेही छान.. पण मला वैयक्तिक ती कधी नाही विशेष आवडली. तिचा आवाज बाकीच्या ४ मधे फार बालिश वाटायचा, आणि माझा तरी रसभंग व्हायचा.. अर्थात त्याला ती काहीच करू शकत नाही, वयच इतकं लहान आहे. पण तिने त्यावरही मेहनत घेतल्याचे जाणवते. शेवटची काही गाणी खूप मॅचुअर्ड गायली ती... तिचं राधाधर मधुमिलिंद हे गाणं फार लक्षात राहीले... :)
आणि कार्तिकी.. मुग्धाहुन किती मोठी आहे ही माहीत नाही नक्की मला.. पण १-२ वर्षांपेक्षा जास्त फरक नसेल दोघींत.. पण गाण्यात किती फरक ?? मला या गोष्टीचे कायम कौतुक वाटत आले. तिची गाण्याची समज, आणि मॅचुअरिटी अफलातून आहे! आत्मविश्वास तर आहा! गायला लागली की कधी कसलं टेन्शन नाही, जो खडा सुर लावते त्याला तोड नाही आहे.. मात्र हो.. पूर्वी अशुद्धा उच्चारांचा एक खडा असायचा कायम.. अलिकडच्या काळात मला जरा ते कमी झाल्यासारखे वाटले. ती मेहनत घेत असावी त्यावर.. नंतर तीने रोहीत कडुन धडे घेतले असावेत.. प्रत्येक गाणं तिचे सारेगमचा सेट गाजवून सोडायचे ! गाणं ऐकणार्‍याला इन्व्हॉल्व करून घेणं, अगदी आपल्या गाण्यावर नाचायला लावणे हे तिला पर्फेक्ट जमले होते!

मला तरी या कारणाने कार्तिकी प्रचंड आवडायची! पण ती जिंकणार नाही असे वाटायचे कारण तिचे उच्चार.. आणि ती जिंकली तर गायकवाड नावामुळे हा विचार अती धक्कादायक आहे! :(

पण असो.. जिंकली कार्तिकी! खूप आनंद झाला मला.. सर्वांना सांगितीक शिक्षणासाठी मदत मिळाली.. अगदी छोट्या गावांतून आलेल्या तिला,प्रथमेशला खूप फायदा होईल, ते दोघं करून घेतील असे वाटते..

एकंदरीत हे पर्व चांगलंच गाजलं! सारेगमला इतकी प्रसिद्धी(आणि बहुतेक पैसाही!) कधी मिळाली नव्हती! पुढचे पर्व त्यांनी कितीही भारी काढले तरी लोकं लिट्ल चॅंप्सना मिस करतीलच काही दिवस..
मला स्वत:ला खूप आनंद मिळाला.. खूप आश्चर्य वाटलं या मुलांचे गाणे ऐकून.. खूप खूप नवी जुनी माहीत नसलेली गाणी कळाली! मजा आली!! :)
Signature2

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्...