१६ ऑक्टोबर, २००७

पेन-स्केच


(सद्ध्या पेन-स्केच-शेडींग चा प्रयत्न चालू आहे.. त्यातलाच एक.. )

Signature2

११ ऑक्टोबर, २००७

नेनचिम!

काय पुस्तक आहे! मराठी मधे science fictions खूप वाचल्या आहेत.. जयंत नारळीकर,निरंजन घाटे, बाळ फोंडके, अजुनही काही.. पण नारायण धारपांची फार कमी पुस्तके वाचली मी.. जी वाचली त्यांची नावं पण आठवत नाहीत आता.. :( असो.. पण आता त्यांची सगळी पुस्तके वाचून काढली पाहीजेत असं वाटायला लागले आहे.. 'नेनचिम' वाचल्यामुळे... !
खरं म्हणजे हे पुस्तक मी अजून २-३ वेळा वाचले तरच मला याच्यावर काही लिहीता येईल.. वाचतानाच इतकं जड जात होतं समजायला, धारपांनी कसे लिहीले कमाल आहे.. केव्हढा अभ्यास असेल त्यांचा! ( अर्थात मला जड जात होतं कारण ते सगळं मराठीतून वाचणं खरच अवघड आहे!)

नेनचिम नावाचा एक आकाशमालेतला छोटासा ग्रह.. तेथील लोकांनी खूपच प्रगती केली आहे.. अगदी science च्या सर्व ब्रॅंचेस मधे! तेथील सर्व शासन व्यवस्था 'ता वरीनी' नावाची संस्था पाहते.. अतिशय उत्तम प्रकारे सर्व ग्रहावर(त्यांच्या मते जगावर) नियंत्रण आणले आहे .. कुठेही असंतोष नाही,सर्व कारभार सुरळीत चालू आहे.. मधल्या काळामधे 'पामिली' नावाची एक संस्था ता वरीनी ने उभी केलेली आहे, जिच्यामधे science च्या सर्व शाखा एकत्र आणल्या आहेत, आणि नव-नविन प्रयोग चालु आहेत..पामिली तर्फे एक नविन प्रयोग अमलात आणण्यात येतो, आणि प्रचंड यशस्वी होतो! 'सिन्तारी' .. एकमेकांच्या मनातील विचार ओळखणारी यंत्रणा.. ज्यामुळे ता-वरीनी चे काम अजुनच सोपे झाले.. गुन्हेगारीला एकदम आळा घालता आला.. परंतू.. लवकरच सर्व शास्त्रद्न्यांना उमगते की नेनचिम चे या आकाशमालेतील वास्तव्य अगदीच छोटे आहे.. म्हणजे तरी काही कोटी वर्ष.. परंतू नजिकच्या काळामधे नेनचिम संपुष्टात येणार आहे याची सर्वाना जाणीव होते. आणि नेनचिम ला कसे वाचवता येईल याचा विचार चालू होतो.. आकाशमाले मधे असा कुठला ग्रह आहे का, की जिथे नेनचिम ची वस्ती हलवता येईल? परंतू असा कुठलाच ग्रह जवळ सापडत नाही. जो सापडतो.. तो कितीतरी प्रकाशवर्षे लांब असतो.. पण तरी प्रयत्न करून पाहयचे ठरते..
सर्व शाखामधले शास्त्रद्न्य कामाला लागतात.. नेनचिम वरील शास्त्र इतके पुढे गेलेले असते, की ते lab मधे मानवाचे बीज तयार करतात.. अशा पद्धतीने store करून ठेवतात की ते जेव्हा यानातून, त्या दुसर्या वस्ती होऊ शकेल अस हवामान असलेल्या ग्रहावर पोचेल तेव्हा तिथे मानवाची उत्पत्ती होऊ शकेल. परंतू या प्रयोगाच्या यशाची खात्री कोणालाच नसते.. थोडक्यात नेनचिम चा जगाच्या पाठीवर कसलंही अस्तित्व नं उरता अंत होणार अशी खात्री पटायला लागते..
तेवढ्यात, रोलान नावाचा शास्त्रद्न्य असा विचार मांडतो की.. नेनचिम हे काही फक्त मानव इकडून तिकडे गेल्याने अमर होणार नाही आहे. आपल्या ग्रहावरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली संस्कृती.. ती जर आपण बाकीच्या जगापर्यंत पोचवू शकलो, तर नेनचिमचे महत्व नक्कीच जगासमोर येईल. इतकी प्रगत वस्ती असणारा हा ग्रह केवळ त्याच जिवनमान कमी आहे म्हणून अंत पावला हे जगाल समजेल.. हा त्याचा विचार सर्वांना पटतो.. आणि जशी एकीकडे मानवी बीज दुसरीकडे नेण्याचे प्रयत्न चालू असतात, तसेच बरोबरीने, नेनचिमचा इतिहास.. नेनचिमवरील महत्वाच्या व्यक्ती.. या ग्रहावर झालेलं संशोधन, नविन प्रयोग..आणि मुक्ख्य म्हणजे सिन्तारी... हे सर्व एका ठिकाणी store केलं जातं.. कालांतराने... नेनचिम वरील वातावरण बदलू लागते.. तापमान वाढ होते.. पाऊस कमी होतो.. हवा विरळ होऊ लागते... थोडक्यात.. वातावरण मानवास राहण्यासाठी उपयोगी राहात नाही.. खूप पुर्वी हा धोका लक्षात घेउन नेनचिम च्या गर्भामधे राहण्याची व्यवस्था पामिलीने केलेली असते.. तेथे हवा, अन्न निर्माण करायचे काम, पामिलीचाच एक शोध, 'यंत्रेश' नावाचे यंत्र करत असते.. परंतू ते प्रयत्न सुद्धा कमी पडत जातात.. सर्व मानव वंश संपतो.. एकपेशीय प्राणी काही काळ तग धरून राहतात, परंतू त्यांचाही पाडाव होतो.. राहते ते फ़क्त... नेनचिम मधील अवाढव्या प्रगत अशा इमारती.. यंत्रे... स्वयंचलीत यंत्रे! जी मानव नसताना देखील चालू राहतात.. अव्याहत त्यांना नेमून दिलेलं काम करत राहतात.. अर्थात या सोयींचा उपभोग घ्यायला कुठलाही मान्व जिवंत नसतो.. कालांतराने.. वातावरण इतके तापते.. की सर्व पोलादी इमारती.. यंत्रे वितळून जातात.. पत्त्यांच्या बंगल्यासारखे खाली कोसळतात... अर्थात आवाजही होत नाही.. कारण मुळात तिथे हवाच नसते... अशा रीतीने नेनचिमचा अंत होतो.....
पुढे आपल्याला समजते की नेनचिम म्हणजेच आपला चंद्र.. ! (अर्थात ही गोष्ट काल्पनिक आहे.. परंतू त्यांनी असे संदर्ब दिले आहेत की पुढे मानव चंद्रावर पाऊल ठेवतो.. ) तेव्हा ४ मानव पहील्यांदा चांद्रावर (इथे : नेनचिम वर) उतरतात.. तेव्हा एक स्फोट होतो.. आणि जमिनीखाली दडवलेली सिन्तारी यंत्रणेबद्दलची माहीती त्या मानवांना मिळेल अशी व्यवस्था झालेली दिसते.. त्या चार मानवांमधे.. १ अमेरीकन, १ रशियन, १ चिनी तर १ अर्थात भारतीय असतो.. भारत नावाचा! त्याला सिन्तारीच्या माध्यमातून इतर ३चे विचार कळतात.. आणि ही यंत्रणा जर पृथ्वीवर आली तर काय अराजक माजेल ते त्याला जाणवते आणि तो ती नष्ट करतो.. इत्यादी....
सगळं कथानक जरी मी इथे लिहीलं असलं तरी ते इत्थंभूत वर्णन, धारपांच्या शैलीमधे वाचण्यामधे मजा आहे!
शक्यतो कुठल्याही science fiction मधे एक सत्याचा आधार असतो.. आणि मग ती कल्पना फुलवलेली असते.. इथेही तसेच आहे.. global warming नी काय काय होऊ शकते याची चुणुक नक्कीच मिळेल.. आणि कितीही शास्त्र प्रगत झाले तरी निसर्ग, वातावरणापुढे आपले काहीही चालणार नाही याची कल्पना येते! त्यामुळे मला आधी कधीही जाणवला नव्हता इतका global warming बद्दल अवेरनेस जाणवला हे पुस्तक वाचून.. तेव्हा पुस्तक मिळालं तर जरूर वाचा....
Signature2

पुस्तकं आणि मी...

मी वाचायला शिकल्यापासून दिसेल ते वाचत आले आहे. खूप लहानपणी ज्योत्स्ना प्रकाशनाची बडबडगीते वगैरे पुस्तकं असायची. मग छोटी छोटी गोष्टीची पुस्...